'लग्नाआधीच नवरा पळाला', सत्तारांच्या राजीनाम्यावरुन गिरीश बापटांचा चिमटा

त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धोका मानला जात आहे.

मुंबई | राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्ता नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खातेवाटपाअगोदरच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार आता आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान कोणतीही अधिकृत माहिती याविषयी समोर आली नाही. यावर याव आता भाजप खासदार गिरीष बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लग्नाआधीच नवरा पळाला असे म्हणत त्यांनी शिवसेनेला खोचक टोका लगावला आहे.

गिरीश बापट म्हणाले की, मी स्वत: कोणतीच बातमी ऐकली नाही. मात्र असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्यापूर्वीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं म्हणत खासदार गिरीष बापट यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

नुकताच महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर आज खातेवाटप होणार असे बोलले जात होते. मात्र यापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी शनिवारी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीला लागलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धोका मानला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies