राज्यातील जनता परमेश्वराच्या भरवशावर, सत्तारांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

आता पुढे काय होणार जनेतेला कळालेच असेल.

मुंबई | राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्ता नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खातेवाटपाअगोदरच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आज मंत्रिमंडळाचे खाते वाटप होणार असे वृत्त येत असतानाच सत्तारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावर आता भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही यावर भाष्य केलं आहे. राज्यातील जनता परमेश्वराच्या भरवश्यावर आहे असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'मंत्रीमंडळात सध्या खातेवरुन गोंधळ सुरू आहे. गेल्या महिन्याभरात ठाकरे सरकाने घेतलेले सर्व निर्णय घटनाबाह्य आहेत. अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही तर सुरवात आहे. आता पुढे काय होणार जनेतेला कळालेच असेल. असा घणाघात पाटील यांनी केला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाना साधला.AM News Developed by Kalavati Technologies