मुंबई | राज्यात शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. महिनाभर राज्यात सत्ता नाट्य सुरू होते. या काळात भाजप आणि शिवसेनेची युती मुख्यमंत्रीपदावरुन तुटली आणि शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करावी लागली. आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र काही शिवसैनिक यामुळे नाराज होते. यामधील 400 शिवसैनिकांनी शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Mumbai: Around 400 Shiv Sena workers joined BJP at an event organised in Dharavi, yesterday. #Maharashtra pic.twitter.com/zGBAVH0zDr
— ANI (@ANI) December 5, 2019