मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकच्या कारागृहात मृत्यू

54 वर्षीय युसूफ मेमेनचा मृत्यू हार्ट अटॅक मुळे झाल्याची प्राथमिक माहिती असून युसूफ मेमन बॉम्ब स्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

नाशिक | मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी टायगर मेमन याचा भाऊ युसुफ मेमन याचा आज सकाळी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे. 54 वर्षीय युसूफ मेमेनचा मृत्यू हार्ट अटॅक मुळे झाल्याची प्राथमिक माहिती असून युसूफ मेमन बॉम्ब स्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ इसाक मेमन हा देखील नाशिकच्याच मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

2018 पासून ते दोघे नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगत असून आज सकाळी गप्पा मारत असताना साडेदहा वाजता युसुफ मेमेनला अचानक चक्कर आल्याने त्याला नाशिजच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.AM News Developed by Kalavati Technologies