धुळ्यात धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

मृत पावलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी दोन जण धुळे शहरातील तर अमळनेर येथील रहिवासी आहे.

धुळे | जिल्ह्यातील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस. एस. व्ही. पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन च्या सुमारास घडली. मृत पावलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी दोन जण धुळे शहरातील तर अमळनेर येथील रहिवासी आहे. इतर तीन जणांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांपैकी एकाचे नाव रोहित गिरासे असे आहे. तो धुळे शहरातील जीटीपी कॉलनी देवपूर येथील रहिवासी असल्याची प्राथामिक माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेत काही विद्यार्थी बेशुद्ध अवस्थेत असल्यानं त्यांचे नाव अजून कळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies