"ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीचीही आस्था नाही", शरद पवारांची मोदींवर टीका

मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु असून, कृषी कायद्यावरून पवारांनी मोदी सरकारला सुनावले आहे

मुंबई । केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरुच आहे. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुबंईत आज आझाद मैदानावर शेतकऱ्याचे आंदोलन सुरु आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, तिन्ही पक्षातील नेते मंडळी आझाद मैदानावर दाखल झाले आहे.

''ही लढाई सोपी नसून, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीचीही आस्था नाही. गेल्या 60 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. देशातील पंतप्रधानांची कधी याची चौकशी केली का ?" असा थेट सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला आहे.

दिल्लीतील आंदोनक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी एकवटले आहेत. आज मुबंईतील आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांना शरद पवार यांनी संबोधित केले.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांचा हा महामोर्चा आज राजभवनावर धडकणार आहे. या ठिकाणी शेतकरी संघटनांकडून राज्यपालांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. आझाद मैदानावर तीन दिवस शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत. राज्यभरातून हजारो शेतकरी मुंबईत आले आहे. त्यामुळे आझाद मैदान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.AM News Developed by Kalavati Technologies