आदित्य ठाकरेंचे साईदर्शन घेवून जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता

आदित्य ठाकरेंचे साईदर्शन घेवून जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता

अहमदनगर । युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पाचोऱ्यातून सुरू केलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सकाळीच अहमदनगर शहरातील विविध मंदिरांना आदित्य ठाकरेंनी भेटी दिल्या. त्यानंतर श्रीरामपूर येथे शेतकरी आणि शिवसैनिकांशी ठाकरेंनी संवाद साधला.

जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात जनतेच भरभरून प्रेम मिळालं. हे प्रेम असचं टिकून रहावं अशी अपेक्षा ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली आहे. तर राज्यातील पुढील सरकार हे युतीचेच असणार आहे. मात्र लोकसभेच्या विजयानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आपण आलो आहे अस मत त्यांनी मांडले. ही राजकीय यात्रा नसून जन आशीर्वाद यात्रा आणि तीर्थ यात्रा आहे. त्यामुळे हे राजकारणावर बोलण्याचे ठिकाण नाही. साई बाबांकडे केवळ जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद मागितले असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली.AM News Developed by Kalavati Technologies