Solapur Breaking : सोलापूरात 24 तासात 230 नवे कोरोनारुग्ण आढळले; रुग्णसंख्या पोहोचली 8135 वर

जिल्ह्यात सध्या 2914 रुग्णांवर उपचार सुरू असून, 4769 जणांना सुट्टी देण्यात आली आहे

सोलापूर । सोलापूर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 230 कोरोनारुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 135 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनाने 452 जणांचा जीव घेतला आहे. सध्या जिल्ह्यात 2914 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर 4769 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies