श्रीगोंदा । अवैध वाळू कारवाईत 8 बोटींसह 40 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट

काही दिवसांपासून बंद असलेले कारवाई सत्र पुन्हा सुरू झाल्याने वाळू तस्कर धास्तावले आहेत

श्रीगोंदा । तालुक्यतील भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या आठ बोटी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत नष्ट करण्यात आल्या. नष्ट करण्यात आलेल्या बोटींची किंमत 40 लाख रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले कारवाई सत्र पुन्हा सुरू झाल्याने वाळू तस्कर धास्तावले आहेत.

अजनुज, आर्वी, पेडगाव या परिसरात बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार श्रीगोंदा महेंद्र माळी यांना मिळाली. त्यानुसार महसूल आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने नदीपात्रात छापा टाकला. त्यावेळी नदीपात्रात वरील तिन्ही ठिकाणी आठ बोटीच्या सहायाने वाळू उपसा सुरू होता. पथक आल्याचे लक्षात येताच वाळू तस्कर पसार झाले. या बोटी ताब्यात घेऊन जिलेटिनच्या सहायाने स्फोट घडवून नष्ट करण्यात आल्या. पथकात पेडगाव मंडळ अधिकारी आजबे, प्रशांत सोनवणे, सतीश घोडेकर पोलीस कर्मचारी दादा टाके पोलिस कॉन्स्टेबल, उत्तम राऊत, पोलीस कॉन्स्टेबल, प्रताप देवकाते पोलीस कॉन्स्टेबल, किरण बोराडे हे सहभागी झाले होते.AM News Developed by Kalavati Technologies