शिर्डी । डुकराच्या हल्यात मुलगा गंभीर जखमी

मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शिर्डी । शाळकरी मुलावर डुकराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिर्डी जवळ घडली आहे. शिर्डी जवळील कोल्हार येथील जिल्हा परिषद शाळेत दुसरीत शिकणारा मुलगा डुकराने केलेल्या हल्ल्यात जखमी झाला आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार भगवती गावातील जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली. जिल्हा परिषद शाळेतच मोकाट डुकरे बिनदिक्कत पणे फिरत असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभव माळी या विद्यार्थ्यावर डुकराने हल्ला केला आहे. यात त्याच्या छातीला डुकराने गंभीर चावा घेतला आहे. शिक्षक आणि ग्रामस्थांनी तातडीने मुलाला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अहमदनगरच्या सिव्हील हाॅस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गावातील मोकाट डुकरांसह इतरही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies