राज्यात परतीच्या पावसाचा कहर, मध्य, लघू प्रकल्प ओव्हरफ्लो

राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

लातूर । लातूर जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. औसा, निलंगा तालुक्यासह अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या बनिमी डोळ्यादेखत वाहून गेल्याने, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. हजारो हेक्टरवरील ऊसाचे फड जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हातबल झाल्याचे चित्र आहे. निम्नतेरणा प्रकल्प भरल्याने तेरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीने प्रवाह बदलल्याने नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नूकसान झाले.

जिल्ह्यातील मध्यम, लघू प्रकल्पही ओव्हरफ्लो झाल्यामुळे ओढ्यांनाही पूर आला आहे. पूलावरून पाणी वाहत असल्याने निलंगा तालुक्यातील 18 गावांचा काहीकाळ संपर्क तूटला होता. दरम्यान नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरसवल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. कपाशी, सोयाबीन, ऊस, मका, बाजरी अशा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता सरकराने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies