नवरात्री निमित्ताने देवीचे सप्तशती पाठ वाचन

सुलाईबुलाई माता उंटावद येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने दुर्गा सप्तशती पाठ वाचन सतत नऊ दिस होणार आहे

जळगाव । पारोळा येथील सुलाई बुलाई माता भक्त परीवार यांनी सोळा कुलस्वामिनी पदयात्रा भक्तांबरोबर बेटावद येथे पाई चालत भक्ताना फराळाची पाकीटे पाणी बॉटल दिली. त्यानंतर सर्व भक्त परीवार यांनी सुलाईबुलाई माता उंटावद येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने दुर्गा सप्तशती पाठ वाचन सतत नऊ दिस होणार आहे.

यावेळी सुलाईबुलाई माता भक्त परीवार पारोळा भक्त यांनी सष्टीला पाठ वाचन करून तेथे देवीची गाणी, जोगवा अशी विविध गाणी सादर करून मंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता. तर पांडुरंग बाबुलाल नावरकर यांनी सपत्निक लक्ष्मीबाई नावरकर यांनी पुजा आर्चा व आरती केली. यावेळी नाशिक, पुणे, धुळे, जळगांव येथील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष सुभाष सखाराम नावरकर पाचोरा, संचालक पी. व्ही. वाणी सर चाळीसगांव, दत्तात्रय भावडू येवले पारोळा, तसेच पारोळा येथील विठ्ठल आनंदा नावरकर सर, सुरेश विठ्ठल नावरकर, बापु काशिनाथ नावरकर, दत्तात्रय पंढरीनाथ नावरकर, वसंत नारायण नावरकर, राजेंद्र जगन्नाथ नावरकर, प्रशांत मधुकर येवले, विजय दत्तात्रय नावरकर, दिनेश नावरकर, डिगंबर पांडुरंग नावरकर, संजय नावरकर, प्रकाश नावरकर, सुनील नावरकर, व लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ माजी अध्यक्षा अनिता संजय पाखले, सदस्य सुरेखा रविद्र नावरकर, मनिषा बापु नावरकर, सुचिता मिलिंद नावरकर, राजश्री डिगंबर नावरकर जळगांव, विद्या येवले, गायत्री येवले , सारिका नावरकर याच्या सह असंख्य भक्त उपस्थित होते. AM News Developed by Kalavati Technologies