माझ्यावर प्रेम असल्याने लोक माझ्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलतात - आदित्य ठाकरे

मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालो आहे - आदित्य ठाकरे

अहमदनगर । आदित्य ठाकरेंचा सुरू असलेला जन आशिर्वाद याञेचा ताफा आज दुपारी राहुरीत धडकला. कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सकाळ पासून शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली होती. आदित्य ठाकरेंच आगमन झाल्यानंतर त्यांनी सांगितल की, मी मते मागायला आलो नाही, तुमचा आशिर्वाद घ्यायला आलोय, सत्ता तर भगव्यांचीच येणार आहे. अन् शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्ज माफीसाठी शिवसेना - युतीत काम करत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या याञेत विजय शिवतरे, रामदास कदम, खासदार सदाशिव लोख॔डे, शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, गणेश खेवरे आदि सह शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक माझ्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलत आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम असल्याने बोलत असतील. असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर बोलताना केले. शेतकरी, विद्यार्थी अशा विविध सामाजिक घटकांशी ते बोलत आहेत. तसेच आज माऊली सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद देखील त्यांनी साधला. मी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फिरत आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे हा माझा प्राधान्यक्रम आहे. बाकीच्या कुठल्या पदाबाबत मला स्वारस्य नाही. अस म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाला बगल दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies