भाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; दोषीकर तात्काळ कारवाई करावी - गृहमंत्री अनिल देशमुख

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर लोकसभा खासदारच्या लिस्ट पाहिली असता, त्यात रक्षा खडसे यांच्या यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे

मुंबई । भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणाची दखल घेतली असून, अशा प्रकारे महिलांचे अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. असे देशमुख म्हणाले.

देशमुख यांनी ट्विट करत सांगितले की, 'भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने संबंधित दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल.' असे ट्विट अनिल देशमुखांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies