चाळीसगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

फेटे आणि पारंपरिक वेशभूषेतील असंख्य महिला आणि युवती मोटारसायकल तसेच सायकल रॅलीत सहभागी झाल्या होत्या

जळगाव । चाळीसगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाची सुरुवात हि प्रतिमापूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवावेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, उद्योजक योगेश अग्रवाल, नगरसेवक संजय रतनसिंग पाटील, मानसिंग राजपूत, देवयानी ठाकरे, आयबीएन लोकमतचे प्रफुल्ल साळुंखे, किसनराव जोर्वेकर, लक्ष्मण शिरसाठ,नगरसेविका अलका गवळी, संपदा पाटील, प्रतिभा चव्हाण, सुचित्रा पाटील, कावेरी पाटील, आबा कच्छ्वा, बी.एन.मोरे,शालिग्राम निकम, रमेश पोतदार, खुशाल पाटील, खुशाल बिडे हे मंचावर उपस्थित होते,

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे येथील प्रसिद्ध व्याख्याते आकाश पाटील यांचे जिजाऊंवर व्याख्यान झाले, तसेच दोन विद्यार्थिनी पूर्वा चौधरी आणि शरयू देशमुख यांनी देखील भाषणे केली, सूत्रसंचालन नगरसेविका सविता राजपूत यांनी केले, शेवटी जिजाऊंच्या पालखीचे पूजन करून शहरातून रॅली काढण्यात आली

यात सजवलेल्या बग्गीमध्ये जिजाऊ आणि बाल शिवबा, अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचे सजीव देखावे आणि जिजाऊ, सावित्री, रमाई यांच्या प्रतिमा ठेवलेली पालखी हे प्रमुख आकर्षण होते तर फेटे आणि पारंपरिक वेशभूषेतील असंख्य महिला आणि युवती मोटारसायकल तसेच सायकल रॅलीत सहभागी झाल्या होत्या. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली.AM News Developed by Kalavati Technologies