कोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 410 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 13 जणांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात 6 हजार 933 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 34 हजारांच्या पार गेला आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. गेल्या 24 तासात 410 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 34 हजार 364 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 933 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 1 हजार 180 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 26 हजार 251 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. रोजच शेकडोंनी वाढणारी रुग्णसंख्या हा आता सोलापूरकरांच्या चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies