मोकाट कुत्र्यांनी चितेतून ओढला मृतदेह, अहमदनगर महापालिकेच्या आरोग्यविभागाचा ढिसाळ कारभार

दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते

अहमदनगर । अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नगर मधील नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत उघडकीस आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील काही तरुणांनी पुन्हा या अर्धवट जळालेला मृतदेहाचा दहनविधी केला.

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी दिवसभरात सुमारे 13 ते 14 अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते. रात्री उशिरा ही एक अंत्यविधी ओट्याच्या खालीच करण्यात आला होता. काही नागरिक दशक्रिया विधी निमित्त अमरधाममध्ये आले असता त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.AM News Developed by Kalavati Technologies