मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी, 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे दिले आदेश

भडकावू भाषण आणि वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालय़ाने राज ठाकरे यांना वॉरंट जारी केले आहे

नवी मुंबई । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांना वॉरंट जारी केले असून, येत्या 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिलं आहे. वाशी टोल नाक्यावर करण्यात आलेल्या तोडफोडप्रकरणी तसेच भडकावू भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशीतीला टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. अखेर न्यायालयानं राज यांनी वॉरंट जारी केले असून, येत्या 6 जानेवारी राज ठाकरे न्यायालयात उपस्थित राहणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies