राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

9 डिसेंबरपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असणार आहेत.

नाशिक | विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या सोमवार पासून म्हणजे 9 डिसेंबरपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. नाशिकमधील पक्ष संघटनेची मोठ नव्याने बांधण्यासाठी ते नाशिकमध्ये तीन दिवसांसाठी असणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्यामुळे 'मनसे'कडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये 'मनसे'ने जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. नाशिक पूर्वमधून 'मनसे'च्या अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली होती. मात्र इतर सहाही ठिकाणी मनसेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना 288 मतदारसंघांपैकी कल्याण ग्रामिणमधील फक्त एकच आमदार निवडून आला आहे.

राज ठाकरेंच्या मनसेने महापौर निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे 'मनसे'चे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. भाजपने 'मनसे'चे नगरसेवक पळवले होते. एकूणच नेते, कार्यकर्ते संभ्रमात पडलेले आहे. दरम्यान ठाकरे तीन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न करणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies