Maratha Reservation : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे

मुंबई । मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवावी यासाठी सरकारच्या वकिलानं विविध उदाहरणं देऊन स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र स्थगिती तूर्तास तरी हटवली जाणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे.

आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार असा प्रश्न मराठा समाजाला पडला आहे. अशात आता अंतरिम स्थगिती उठवण्यास घटनापीठाने नकार दिल्याने हे प्रकरण आणखीणच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असे या घटनापीठने म्हटले आहे.AM News Developed by Kalavati Technologies