मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर, पुढच्या महिन्यात होण्याची शक्याता

मराठा आरक्षणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली आहे.

एम टेस्क स्पेशल ।  मराठा आरक्षणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली आहे. पुढील सुनावणीही 8 मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सर्व याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी ही समोरासमोर व्हावी अशी मागणी केली होती.सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान सकारात्मक संकेत दिेले आहे, तीन ते चार आठवड्यांनी यावर सुनावणी सुरु करु म्हणजेच प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी दस्तऐवजांच्या खंडांच्या प्रिंट काढायच्या असून त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत.यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासुन सुरु करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती.

त्यामुळे घटनात्मक खंडपीठाकडून मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी तारखा निश्चीत करण्यात आल्या आहेत. 8,9,10 मार्च रोजी मराठा आरक्षणाच्या विरोधातले युक्तिवाद करणार आहेत. तर 12,15,16 मार्च रोजी राज्य सरकार युक्तिवाद करणार आहे. तर 18 मार्चला केंद्राच्या वतीने अॅटर्नी जनरल बाजू मांडणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies