तुम्ही मोजले नाही याचा अर्थ मृत्यु झाला नाही असे नाही - राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

लॉकडाऊनच्या काळात प्रवास करतांना कित्येक कामगारांचा मृत्यु झाला होता, त्यांच्या आर्थिक मदतीवर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली । काँग्रेसचे पुर्व अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सोमवारी संसदेत कामगार मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते की, लॉकडाऊनच्या किती कामगारांच्या मृत्यु झाला त्यांची माहिती सरकारकडे नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. असे वक्तव्य कामगार मंत्रालयाकडून करण्यात आले होते. त्यावर राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या सोबत उपचारासाठी अमेरिकेला असून, त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, " मोदी सरकारला हे माहित नाही की, लॉकडाऊनच्या काळात किती प्रवासी कामगारांचा मृत्यु झाला. तसेच किती जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. सरकारने प्रवासी कामगारांच्या मृत्युची नोंद केली नाही याचा अर्थ मृत्युच झाला नाही असे नाही." पुढे राहुल म्हणाले की, " लॉकडाऊनच्या काळात कित्येक कामगारांचा मृत्यु झाला असून सरकारला कामगारांच्या मृत्युचं गांभीर्य नाही. ही खुप दुर्दैवाची गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांनी कसा प्रवास केला तसेच प्रवास करतांना किती जणांचा मृत्यु झाला. याला संपुर्ण जगाने बघितले आहे. मात्र मोदी सरकारने हे पाहिले नाही" असे ट्विट करत राहुल यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विचारले होते की, लॉकडाऊनच्या काळात आप-आपल्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांनी पायपीट झाली. त्यामध्ये प्रवास करतांना कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याचा आकडा सरकारकडे आहे का? तसेच त्यांना आर्थिक मदत मिळणार का? असा प्रश्न विरोधकांनी विचारल्यानंतर कामगार मंत्री संतोष कुमार म्हणाले होते की, " त्या कामगारांची नोंद आम्ही केलेली नाही, त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्न निर्माणच होत नाही" असे उत्तर आल्यानंतर आज राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies