महाविकासआघाडी सरकार शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरले - गिरीष महाजन

शासनाने जनतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

जळगाव, जामनेर | महाविकासआघाडी सरकार शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरले असून शासनाने मका कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करावे अशी मागणी भाजप नेते गिरीष महाजन यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज तातडीने देण्यात यावे यांच्यासह विविध मागण्यासाठी जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तहसीलवर भव्य मोर्चा काढून तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे.

"आज पेरणीचे दिवस आले आहे मात्र आज पर्यंत शेतकऱ्यांच्या घरात कापूस व मका पडला आहे. जामनेर तालुक्यातसह राज्यातील शेतकऱ्यांना विविध समस्या असून महाविकासआघाडी शासन हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरत आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे कारण गेल्या वर्षी पिकवलेला मका कापूस यांच्यासह धान्य सरकार घ्यायला तयार नाही, खतांचा तुटवडा आहे याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्याचबरोबर करूना सारख्या महामारी आजाराकडे दुर्लक्ष सरकार करीत आहे त्यामुळे शासन ही फक्त आपले भांडण सोडवत बसले आहे मात्र आज राज्याला त्यांनी रस्त्यावर सोडले असून शासनाने जनतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी निवेदन देतांना सांगितले"

जर येत्या आठ दिवसात राज्य सरकारने कापूस मका खरेदी करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज द्यावे अन्यथा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढू असा इशारा यावेळी बोलतांना दिला आहे यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप कोळपे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies