धुळ्यात गुटखा लपवून नेणारी लक्झरी जप्त

31 लाख 36 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

धुळे | धुळे शहरातील गिंदोडिया चौकात आझादनगर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. यावेळी लक्झरीत लपवून ठेवलेला 1 लाख 36 हजाराचा गुटखा आणि 30 लाखांची लक्झरी बस असा एकूण 31 लाख 36 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध धंदे आणि वाढणाऱ्या घरफोड्या यांना आळा बसावा यासाठी पोलीस ठाणे निहाय वेळोवेळी नाकाबंदी करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यानुसार, शहरातील गिंदोडीया चौकात आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नाकाबंदी लावण्यात आली होती.AM News Developed by Kalavati Technologies