सांगली | सांगली जिल्ह्यातील गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये 'लंपी स्कीन डिसीज' या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले आहेत. दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विशेषत: जत व कवठेमहांकाळ तालुक्यात गाय व म्हैसवर्गीय पशूधनामध्ये लंपी स्किन डिसीज (एलएसडी) या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून येत आहे.
आजारी जनावरे या रोगाने बाधित झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. लंफी स्किन डिसीज आजार विषाणूजन्य असून, बाधित जनावरांच्या संर्पकाने इतर निरोगी जनावरे बाधित होऊ शकतात. कोरोना अनलॉक नंतर बाजार समितीच्या जनावरे बाजार आवारात शेळ्या, मेंढ्याचे बाजार भरवण्यास स्थानिक पातळईवर मंजूरी देण्यात आलेली होती.