शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी जळगावमध्ये गणपतीला साकडे

जळगावातील इच्छापूर्ती गणपती मंदिरावर आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली होती

जळगाव । जळगावातील इच्छापूर्ती गणपती मंदिरावर आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली होती. या ठिकाणाहूनच आज जळगावातील शिवसैनिकांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी गणपती गणरायाला साकडे घालीत महारथी केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटात सापडल्या शेतकरी बांधवांना या संकटातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो व महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होवो यासाठी शिवसेना जळगाव महानगर तर्फे महाआरती करण्यात आली. यापूर्वीही जळगावातील प्रसिद्ध असलेल्या इच्छापूर्ती गणपती मंदिर राहून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात याच ठिकाणाहून केली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावे या निमित्ताने गणपती गणरायाला साकडे घालून महाआरती केली. याप्रसंगी महानगरप्रमुख शरद तायडे,विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, महानगर संघटक दिनेश जगताप, नगरसेवक नितीन बर्डे, शाम कोगटा ,महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी ,ज्योती शिवदे, मनिषा पाटील ,विमल वाणी, जितू मुंदडा, मानसिंग सोनवणे, अजय पाटील, प्रशांत सुरळ्कर ,निलेश देशमुख, शरद पाटील, ईश्वर राजपूत, प्रविण पटेल ,प्रकाश बेदमुथा, गणेश सोनवणे, अन्कुश कोळी, साडीक खाटिक ,प्रकाश पाटील, ओगल पान्चाळ, संजय सांगळे, शन्ताराम सुर्यवंशी, भावेश ठाकुर, विकास चौधरी, वीकास भदाने, संतोष पाटील, पूनम राजपूत, जाकिर पठाण, आशीक शेख जब्बार शेख शंतनु नार्खेडे आदिसह असंख्य शिवसैनिक उपस्थीत होते.AM News Developed by Kalavati Technologies