नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर अपघात, पाच गंभीर जखमी

दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

नाशिक । नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर येवल्याजवळ दोन कारची भीषण धडक झाली यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. येवल्याजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारवरती पाठीमागून आलेल्या ब्रिजा कारणे जबरदस्त धडक दिल्याने उभ्या असलेल्या कारमधील महिलांना जबरदस्त मार लागल्याचे सांगितले जाते. उभे असलेले कारमधील येवला तालुक्यातील अंगुलगाव येथील जगझाप शिक्षक कुटुंबापासून ते आपल्या आजीच्या अंत्यविधीसाठी नाशिक वर्ण याकडे येत असल्याचे बोलले जाते दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जखमींना येवला येथील काकड रुग्णालयात दाखल केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies