शहापूर येथील शेतकऱ्याची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या

परतीच्या पावसाने पिके नष्ट झाल्याने संपविले जिवन

जळगाव । जामनेर तालुक्यातील शहापूर येथील भास्कर राघो सपकाळ वय-55 या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकिस आली. भास्कर सपकाळे हे रात्री आपल्या कुटुंबियांसह घरात झोपलेले आसताना सकाळी त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांना उठविले आसता ते उठत नसल्याचे त्यांच्या घरच्या मंडळींच्या लक्षात आले. तसेच त्यांच्या तोंडाला फेस येत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.

यावेळी त्यांच्या घरातील मंडळींनी त्यांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयताकडे अडीच एकर कोरडवाहू शेती असून त्यावर त्यांनी कपाशी पिकाची पेरणी केलेली होती. संसाराचा गाडा चालविण्यासाठी त्यांनी भारतीय स्टेट बँक, विकास सोसायटी व खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या शेतातील कपाशी पीक पूर्णतः खराब झाल्याने व शासकीय मदत मिळण्यास उशीर होत असल्याने आपण काढलेले कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे त्यांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. मयताच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.या बाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.AM News Developed by Kalavati Technologies