राज्यात संचारबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता, गुजरातमधून येणारी वाहतूक बंद

राज्यातील संचारबंदीमुळे गुजरातमधून येणारी वाहतूक बंद, अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना मनाई

नंदुरबार | राज्यात जिल्ह्याअंतर्गत रस्तेबंदी केली जात असतांनाच दुसरीकडे राज्याच्या सीमाबंदीच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यास प्रशासनाने सुरु केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या गुजरात राज्याला लागुन असणालेल्या नवापुर तालुक्यातील बेडकी आणि अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाली या दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सीमा तपासणी नाका येथून पोलिसांनी गुजरातकडुन येणारी जाणारी वाहतुक बंद केली आहे.

मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भाग असणाऱ्या खेतीया जवळ तसेच गुजरात राज्याला जाणाऱ्या वाका चार रस्ता भागात देखील अशाच पद्धतीने नाकाबंदी केली आहे. या बंदीमुळे आज अनेक वाहनांना तपासणीपासुनच परतावे लागत असल्याचे चित्र दिसुन आले आहे. कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून ही नाकाबंद करण्यात आली आहे. मात्र या नाकाबंदीत अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवा वगळता कुठल्याही वाहनांना राज्यात येण्यास बंदी करण्यात आलेली आहे  AM News Developed by Kalavati Technologies