खळबळजनक! एकतर्फी प्रेमप्रकरणातून; तरुणाने तरुणीच्या घरात घुसून केला आत्महत्येचा प्रयत्न

राहुरीत एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात प्रेमप्रकरणातून एका तरूणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने, परिसरात खळबळ उडाली आहे. यात सदर तरूणी बचावली असुन तिची प्रकृती चिंताजनक आहे. देवळाली प्रवरा या गावात एकतर्फी प्रेमातून विक्रम रमेश मुसमाडे (वय 30) या तरूणाने गावातीलच तरुणीच्या बंगल्याच्या मागील दरवाज्यातून आत प्रवेश केला.

स्वयंपाक गृहात सदर तरूणी काम करत असताना, विक्रम याने 'तू माझ्यावर प्रेम का करत नाही असे विचारणा केली.' यावेळी तरूणीची लहान बहिण तिथे आली असता, विक्रमने तिलाही मारहाण करत कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून त्या तरूणीवर ठेवला असता; तरुणीच्या आजीने विक्रम यास जोराचा धक्का दिल्याने कट्यातुन सुटलेली गोळी तरुणीच्या डोक्याला जवळून गेल्याने सुदैवाने ती तरूणी वाचली. मात्र तरूणाने स्वतःच्या डोक्याला कट्टा लावत स्वतः वर गोळी झाडून घेतली. यामध्ये तो तरूण गंभीर जखमी झाला असुन त्यास पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली. तर फॉरेन्सिक लँबचे पथक, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी देखील घटनास्थळी धाव देत पुढील तपासाची चक्रे फिरवली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies