एकनाथ खडसेंच्या कन्येने फोडला प्रचाराचा नारळ, सेनेच्या बंडखोराचे आव्हान

रोहिणी खडसे यांच्या विरोधात सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे.

जळगाव | मुक्ताईनगर मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी मुक्ताईमंदिरात मुक्ताईच दर्शन घेत आपला प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, मंदाताई खडसे यांच्यासह शेकडो भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहिणी खडसे यांच्या विरोधात सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. त्यांना आघाडीने पाठिंबा दिला आहे. मात्र हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला असला तरी जनतेला मात्र हा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार कमी करण्याची अजित दादा पवार यांची ही खेळी असली तरी त्यात त्यांना यश मिळणार नसल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी सेनेचा राजीनामा दिला असल्याचं आणि मतोश्रीने तो स्वीकारले नसल्याचं सांगितलं जातं असलं तरी, पदावर असताना चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी ही बंडखोरी नसून पक्षाशी गद्दारी असल्याचं म्हटलं आहे. अशा गद्दारीमुळे आपले कार्यकते आपल्याला ही सेनेला मदत करण्याविषयी प्रश्न विचारत असतात. मात्र युती असल्याने प्रत्येकानेच युती धर्म पाळला पाहिजे, या विचाराचे आपण असल्याचं म्हटलं आहे. अपक्ष उमेदवार आणि सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीचा राज्यात कोणताही परिणाम होणार नसल्याचं मत एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies