संचारबंदी आदेशाला धुळे जिल्ह्यात केराची टोपली

पोलिसांनी खाक्या दाखवत बाजारातील सर्व दुकाने केली बंद

धुळे । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेचे उपाय म्हणून राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केल्यानंतर आज धुळ्यात या आदेशाला केराची टोपली दाखवत पाच कंदील परिसर तसेच साक्रीतील बाजारपेठा फुललेल्या बघावयास मिळाल्या. परंतु, धुळे पोलिसांनी खाक्या दाखवत या बाजारातील सर्व दुकाने बंद केली व संचारबंदी चे उल्लंघन करणाऱ्या टवाळखोरांना चोप देऊन अद्दल घडवली. तसेच पोलिसांनी दुकान चालकांचे तराजू जप्त केले.AM News Developed by Kalavati Technologies