धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी नगर-मनमाड रोडवर रास्तारोको

धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी नगर-मनमाड रोडवर रास्तारोको

शिर्डी | धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ राहुरीत आंदोलन छेडण्यात आले आहे.

धनगर समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात "अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य" मुंबई या संस्थेने केलेल्या याचिकेच्या आतापर्यंत अनेक सुनावण्या झाल्या आहेत. पंरतू मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत. या सुनावणीचा खर्च सरकारने करून त्वरीत मागण्या माण्य कराव्यात या मागणीसाठी आणि उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राहुरीतील नगर-मनमाड रोडवर रास्तारोको करून सरकाराचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies