विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, निफाड तालुक्यातील घटना

खेरवाडी येथील तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक | निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कमलेश दामू धारबळे (वय 32 वर्ष) असं मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. माहितीनुसार खेरवाडी येथील तरुण शेतकरी कमलेश हे शेतातील विहिरीवरील वीज पंप सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वीज प्रवाह हा शेतातील विद्युत पंपच्या पेटीमध्ये उतरला असल्यानं शेतकरी कमलेश धारबळे यांचा विजेचा जोरदार धक्का बसला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यानंतर कमलेश यांचा मृतदेह निफाड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी करून पोसमोर्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कमलेश धारबळे घरातील कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा,1 मुलगी, आई, 3 भाऊ असा परिवार आहे. कमलेश यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबावर शोककळा आली आहे. खेरवाडी येथील तरुण शेतकरी गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies