Corona Vaccine : मध्यप्रदेशात कोरोना लस घेतलेल्या समाजसेवकाचा 9 दिवसांनी मृत्यू

मध्यप्रदेशाची कोरोना लस घेतलेल्या समाजसेवकाचा लस घेतल्यानंतर 9 दिवसांनी मृत्यू झाल्याने, कोरोना लसीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

भोपाळ । मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये कोरोना लस घेणाऱ्या समाजसेवकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना लसीसंर्दभात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिपक मरावी असे लस घेतलेल्या समाजसेवकाचे नाव असून, त्यामे को-व्हॅक्सीन लसीचा डोस घेतला होता. लसीकरणाच्या 9 दिवसानंतर 21 डिसेंबरला दिपकचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूचा खुलासा 8 जानेवारी रोजी समोर आला. त्यामुळे परिसरात कोरोना लसीकरणावरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपकच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरात विष आढळल्याचं समोर आलं आहे. नेमकं दिपकचा मृत्यू कोरोना लसीनं झाली का? हे अजुन सिद्ध झालेले नाही. पिपल्स मेडिकल कॉलेजने संबंधित रिपोर्ट हा केंद्र सरकारला पाठवला आहे. मात्र केंद्राकडून यासंबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies