Corona Update : सोलापूरात आज 543 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; 15 जणांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात 6 हजार 999 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 965 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. आज पुन्हा 543 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झाले आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 25 हजार 929 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 999 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 965 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 17 हजार 865 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, वाढती रुग्णसंख्या आता चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies