Corona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7 हजार 284 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 32 हजार 732 एवढी झाली आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायमच आहे. आज जिल्ह्यात पुन्हा 437 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 32 हजार 732 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 284 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत उपचारादरम्यान 1 हजार 134 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात सुमारे 24 हजार 314 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोजच शेकडोंनी वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.

हेही वाचा: कोरोना अपडेट | कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 350 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू



AM News Developed by Kalavati Technologies