राज्य विभाजनासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची, नाना पटोलेंचे सूचक विधान

महाविकास आघाडीचे सरकार हे ब्रम्हा, विष्णू, महेश अशा विचारांचे सरकार आहे.

शिर्डी | विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतलं. राज्य प्रगतीकडे जावे, आणि राज्यातील जनता सुखी समाधानी राहावी अशी प्रार्थना साईबाबांकडे पटोले यांनी केली. तर राज्य विभाजनाची मागणी जनतेतून होत असली तरी त्यासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे सूचक वक्तव्य पटोले यांनी शिर्डीत केल.

महाविकास आघाडीचे सरकार हे ब्रम्हा, विष्णू, महेश अशा विचारांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काही बदल होतील असं वाटत नसल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचा समन्वय साधून जनतेच्या भल्याचे निर्णय व्हावेत अशी आपली भूमिका असल्याचं देखील पटोले म्हणाले.

महाराष्ट्र राज्य विभाजनाची मागणी जनतेतून मोठया प्रमाणात असली, तरी यात केंद्राची भूमिका महत्त्वाची असते. संयुक्त महाराष्ट्र म्हणून राज्य पुढे जावे असे काहींचे विचार, तर राज्याच्या विभाजनाची मागणी ही त्या त्या विचारांच्या लोकांची असू शकेल, असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो. वैद्य यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे चार राज्यांमध्ये विभाजन करावे अशी मागणी केली होती. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies