भाजपचा बालेकिल्ला गडगडला, जामनेरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जामनेरातील सुमारे दीडशे ते पाऊणे दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी मनगटावर घड्याळ बांधली आहे

जामनेर । गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यातील भाजपचे दोनशेच्या वर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत मुक्ताईनगर येथे पक्षप्रवेश केला. दोन लक्झरी बसेस भरून कार्यकर्ते मुक्ताईनगरात पक्षप्रवेशसाठी दाखल झाले. खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फॉर्म हाऊसवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनगटावर घड्याळ बांधली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, रोहिनी खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.

दरम्यान, खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगावात राष्ट्रवादीला मोठं बळ मिळणार आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे दिग्गज नेते होते. मात्र त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जवळपास दीडशे ते पाऊणे दोनशे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. त्याचे राष्ट्रवादीत स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया ए.एम. न्युजशी बोलतांना खडसे यांनी दिली.

Published by: Salman ShaikhAM News Developed by Kalavati Technologies