बहुमताचा ठराव संमत होताच नगरमधे शिवसैनिकांचा जल्लोष..

महाविकास आघाडीचे सरकार आल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार- शशिकांत गाडे

अहमदनगर । राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आज बहुमत ठराव 169 विरुद्ध शून्य मतांनी जिंकताच नगर शहरात शहर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नगर-पुणे महामार्गावर शिवसेना उपनेते मा. आ. अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला. फटाके फोडत आणि पेढे वाटून हा आनंद आणि जल्लोष करण्यात आला. जिल्हाध्यक्ष गाडे यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आता सुटणार असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल यात शंका नसल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान आज उध्दव ठाकरे सरकारने विधीमंडळात विश्वास दर्शक ठराव 169 विरूध्द शून्य अशा बहुमताने जिंकला. यावेळी चार आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. भाजपने हे अधिवेशन घटलेला धरून नाही, म्हणत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.AM News Developed by Kalavati Technologies