अर्णब, कंगनाला कोर्टात झटपट न्याय मिळतो पण..;बेळगाव मुद्द्यावरुन 'सामनातून' कर्नाटक सरकारवर टीकास्त्र

मुंबईहा कर्नाटकचा भाग आहे असे वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केला होता. त्यावर आज सामनातून शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे

मुंबई । महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरून दोन्ही राज्यांच्या सरकारमध्ये वाद होत असतात. मराठी बांधव बेळगावला महाराष्ट्रात घेण्याची मागणी करत आहे. तर महाराष्ट्रातील मुंबईसुद्धा कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केला आहे. त्यावर आता शिवसेना आक्रमक झाली असून, शिवेसना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली आहे.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत शिवसेनेनं सामनातून सीमाप्रश्नावर भाष्य केलं आहे.

“कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी करताच कानडी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मिरच्या झोंबल्या आहेत व त्यांनी थयथयाट सुरू केला आहे, पण त्यांच्या थयथयाटाला भीक घालण्याची गरज नाही. ‘मुंबईतसुद्धा भरपूर कानडी लोक राहतात, म्हणून मुंबई शहर कर्नाटकास जोडा’ असे एक टिनपाट विधान लक्ष्मणरावांनी केले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदींचे हे विधान म्हणजे ते ठार वेडे असल्याचे लक्षण आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

"सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. अर्णब, कंगनासारख्यांना सर्वोच्च न्यायालयात झटपट न्याय मिळते. पण लाखो मराठी सीमा बांधवांचा आक्रोश, त्यांनी सांडलेल्या रक्ताची वेदना सर्वोच्च न्यायालयास दिसत नाही का?" असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies