जळगावमध्ये आणखी 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत आहे.

जळगाव | जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत आहे. जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यामध्ये 78 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगावातील 26 रुग्ण, भुसावळ येथील 3 रुग्ण, तर एरंडोल येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांमुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 381 इतकी झाली आहे. आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 40 जणांचा बळी या आजारानं घेतला आहे. AM News Developed by Kalavati Technologies