मोकाट जनावरांचा वृद्धावर हल्ला, वृद्ध गंभीर जखमी

नागरिकांनी पुढे सरसावत जनावरांच्या तावडीतून वृद्धाची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला

शिर्डी । कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका वृद्धावर मोकाट गाई आणि बैलांनी हल्ला चढवला आहे. या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात मुरलीधर कुलकर्णी हे वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास भर बाजारपेठेत ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण आहे.

कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रमाण सध्या वाढला असून पालिका प्रशासनाच्या वतीने या मोकाट जनावरांचा कोणताही बंदोबस्त न केल्यामुळे हे जनावर भररस्त्यात येऊन थांबतात, त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय. आज तर या मोकाट जनावरांनी चक्क एका वृद्धावर हल्ला चढवला हा हल्ला इतका गंभीर होता की वृद्धाच्या हाताच्या तीन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी पुढे सरसावत या जनावरांच्या तावडीतून वृद्धाची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.

गणेश विसर्जन मिरवणुक तोंडावर येऊन ठेपली आहे आणि अशा परिस्थितीत नगरपालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे असताना कोणतीही कारवाई नगरपालिका मार्ग झाली नसल्याने ही दुर्घटना घडली आहे. आतातरी पालिका प्रशासन नाही जागे होऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगावच्या जनते कडून केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies