नेवासा तालुक्यात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण

तालुक्यातील रुग्ण संख्या 185 वर पोहचली आहे

अहमदनगर | नेवासा तालुक्यात आज शुक्रवार 31 जुलै रोजी सकाळी प्रशासनास आलेल्या अहवालात 6 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. तर तालुक्यातील रुग्ण संख्या 185 वर पोहचली आहे .

तालुक्यातील सुरेगाव येथे दोन दिवसांपूर्वी आढळल्या रुग्णाच्या संपर्कातील 3 व्यक्ती, तर नेवासा शहरात 1 व्यक्ती तसेच कारागृहात पुन्हा 1 आरोपी कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे नेवासा कारागृहातील आतापर्यंत एकूण 23 आरोपी कोरोनाबाधित झाले आहे. तर गणेशवाडी येथील 1 व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेतून आलेला अहवालात पॉझिटिव्ह आला आहे. AM News Developed by Kalavati Technologies