अहमदनगर । केके रेंजच्या युद्ध सराव भूमीवर भारतीय यांत्रिकी पायदळाची थरारक प्रात्त्येक्षिके

काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, हवाई दलाला सध्याच्या काळात नवे महत्व प्राप्त झाले

अहमदनगर । अहमदनगर शहरा नजीक असलेल्या केके रेंज या युद्ध सराव भूमीवर आज सोमवारी एसीसी अँड एस या लष्कराच्या यांत्रिकी पायदळाचा वार्षिक सराव अभ्यास आपल्या देशाचे आणि मित्र राष्ट्राचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एसीसी अँड एसचे मेजर जनरल एस झा, एमआईआरसीचे ब्रिगेडियर विजय सिंह राणा उपस्थित होते. भारतीय लष्करी यांत्रिकी पायदळातील एमबीटी अर्जुन, टी नैन्टि(90), भीष्म, टी-72 अजेय, बीएमपी या रणगाड्यांसह, मोटार वाहक ट्रॅक, शत्रूवर हळ्यास सज्ज असलेले आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले रुद्र, चेतक हेलिकॉप्टर, वायू सेनेचे फिक्स विंग्ज आदींनी सहभाग नोंदवत भारतीय लष्कराच्या अदभूत ताक्तीची अनुभूती ह्याची डोळा ह्याची देहा उपस्थितांना दाखवली.

या युद्ध सराव प्रात्येक्षिकात भारतीय लष्करी दलात असलेल्या रणगाड्यांनी आपल्या क्षमता, अचूकता, भेडकता, निडरता याचे प्रदर्शन करत दिलेल्या लक्षांवर अचूक मारा करत आपली युद्ध सज्जता दाखवली. जमिनीवरील लक्ष असो वा आकाशातले, अचूक पणे शत्रूच्या लक्षावर मारा करून देश सुरक्षित असल्याची अनुभूती देतानाच चुकूनही शत्रूदेशाचे सैन्य आपल्या भूमीकडे आगेकूच करताना दिसले तर त्याच्यावर प्रतिप्रहार करून त्याला नेस्तनाबूत करण्याचे साहस भारतीय जवानांत किती ठासून भरलेले आहे. आणि जोडीला उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरात आपले सैन्य कसे पुढारलेले आहे. याची चुनुक या सर्व प्रत्येक्षिकातून उपसस्थितांनी घेतली.

जगातील प्रत्येक देशाच्या सीमा-सुरक्षिततेच्या दृष्टीने जमिन आणि जमिनीवरून आकाशावर वर निगराणी ठेवणारे दल अर्थात पायदळाची भूमिका अन्यन्यसाधरण अशीच असते. यात यांत्रिकी पायदळ हे तर युद्धजन्य परिस्थितीत किती मोलाचे काम करते हे आजवर जगात लढलेल्या अनेक लढायांत समोर आलेलं आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, हवाई दलाला सध्याच्या काळात नवे महत्व प्राप्त झाले. एकीकडे एअर स्टाईक हा जगाच्या दृष्टीने परवलीचा शब्द बनला असला तरी म्हणून जगातील कोणत्याही देशाने आपल्या यांत्रिकी पायदळा कडे आजही दुर्लक्ष केलेले नाही, कारण हेच यांत्रिकी पायदळ एकीकडे आपल्या देशाच्या भूमीत शिरू पाहणाऱ्या शत्रूच्या सैन्याला रोखताना उलट शत्रू राष्ट्राच्या भूमीत आगेकूच करत जगाचा भूगोल बद्दलवण्याची ताकत ठेवून असते. आणि म्हणूनच आपल्या भारत देशाचीही यांत्रिकी पायदळाची ताकत ही प्रत्येक भारतीयांची अभिमानाने छाती फुगवणारी,आपल्या मित्र राष्ट्राला चकित करणारी आणि शत्रू राष्ट्राला धडकी भरवणारी अशीच आहे.



AM News Developed by Kalavati Technologies