अहमदनगर । भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर भिरकावला कांदा

सकाळी कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याचे भाव 100 रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत प्रती क्विंटलपर्यंत घसरले

अहमदनगर । नेप्ती उपबाजार समितीत आज कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत कांदा फेक केली. यानंतर संतप्त शेतकर्‍यांनी बाह्यवळण रस्त्यावर तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात सोमवारी कांद्याचे भाव साडेपाच हजार क्विंटलपर्यंत गेले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी आज मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र सकाळी कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याचे भाव 100 रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत प्रती क्विंटलपर्यंत घसरले. यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले. हे भाव मान्य नसल्याने शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत कांद्याचे लिलाव बंद पाडले. व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये यावरून चांगलीच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांनी कांदे फेकण्यास सुरुवात केली असता व्यापाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलन खूपच पेटले. बाह्यवळण रस्त्यावर शेतकऱ्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनकर्ते शेतकरी व व्यापारी यांच्याशी समन्वय साधत चर्चा झाल्यानतंर. लिलाव पुन्हा घेण्याच्या अटीवर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.AM News Developed by Kalavati Technologies