अहमदनगर । वादग्रस्त पुस्तकाचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धअभिषेक

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर जगाचे महान राजे होते.

अहमदनगर । 'आजके शिवाजी नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाचा अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी शहरातील जुने बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धअभिषेक घालण्यात आला. तसेच भाजप आणि वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर जगाचे महान राजे होते. त्यांचा आदर्श आणि सन्मान खूप मोठा आहे, त्याची तुलना कुणाही एका व्यक्ती बरोबर होऊ शकत नाही. असे असताना एका भाजपच्या लेखकाने छत्रपतींची तुलना नरेन्द्र मोदी यांच्या सोबत करून करोडो शिवप्रेमींचा अपमान केला आहे असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी केलाय.



AM News Developed by Kalavati Technologies