अहमदनगर । पॅजो-स्विप्ट कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

पॅजोमधील दोन-तीन जण जखमी

अहमदनगर । अहमदनगर-दौंड रस्त्यावर पॅजो आणि स्विप्ट कारचा आज अपघात झाला. त्यात पॅजोमधील एकाचा मृत्यू झाला. बबन रज्जाक शेख असे मयताचे नाव आहे. पॅजोमधील दोन-तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर-दौंड रोडवरील अरणगाव शिवारात स्विप्ट कारला पॅजो रिक्षाची मागून धडक बसली. या अपघातात पॅजोमधील बबन रज्जाक शेख यांचा मृत्यू झाला. मृताच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. या अपघातात पॅजोमधील तीन जण जखमी झाले आहेत. अहमदनगर तालुका पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी याच ठिकाणी टेम्पोने सायकलस्वाराला धडक दिल्याने अवतार मेहराबाद ट्रस्टमधील ३५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता.AM News Developed by Kalavati Technologies