शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या, युवासेनेची मागणी

शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

जळगाव । महाराष्ट्रासह जामनेर तालुक्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे 100% पिकाचे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी याबाबत जामनेर तालुका शिवसेना व युवासेना तर्फे शहरातून मोर्चा कडून तहसील समोर ठिय्या आंदोलन केले व तहसीलदारांना यावेळी शिवसेनेतर्फे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करावा नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे सातबारा कोरा करून 100% कर्जमुक्ती करावी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बसचा मोफत पास द्या, जानेवारी दोन हजार वीस पासून सर्वत्र चारा छावण्या उभाराव्या, आत्महत्या ग्रस्त शेतकरी त्यांच्या कुटुंबियांना आत्महत्या मदत पाच लाख रुपये देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यांनी जामनेर तालुक्यातील नेते व जलसंपदा मंत्री हे शेतकऱ्याची व्यथा जाण्यासाठी तालुक्यात आले नसून ते सत्ता स्थापन करण्यात व्यस्त असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला शासन बनवण्यात व्यस्त आहे. मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांशी बोलताना युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील यांनी केला. त्याचबरोबर शिवसैनिक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे गोवा ही शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी दिली. या शिवसेनेच्या आंदोलनामध्ये युवा सेना जिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील शहर प्रमुख पवन माळी शिवसेना जिल्हाध्यक्ष सोनू मामा शामराव पाटील सुकलाल बारी गणेश पांढरे भरत पवार आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते व शेतकरी बांधव उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies