जळगावात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात 117 रुग्णांची नोंद

कोरोनामुळे आज दिवसभरात 5 जणांचा बळी सुद्धा गेलाय.

जळगाव | जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे थैमान काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज जिल्ह्यात तब्बल 117 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळं कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2 हजार 971 वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 54 रुग्ण, भुसावळ 6 रुग्ण, अमळनेर 04 रुग्ण, चोपडा 3 रुग्ण भडगाव 21 रुग्ण, धरणगाव 01 रुग्ण, यावल 10 रुग्ण, एरंडोल 1 रुग्ण, जामनेर 2 रुग्ण, जळगाव ग्रामीण 3 रुग्ण, रावेर 8 रुग्ण, आणि पारोळा येथील 4 रुग्णांचा समावेश आहेत.

तसेच आज दिवसभरात या आजारानं 5 जणांचा बळी घेतला असून कोरोनामुळं मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 214 वर गेलाय. तर दिवसभरात 47 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 766 वर पोहचली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 991 रुग्णांवर उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies